Headlines

'लव्ह जिहाद'ला 'बाजीराव-मस्तानी'ने उत्तर द्या:मस्तानीला घरी आणणाऱ्या हिंदूला 1 लाखाचे बक्षीस; मिलिंद एकबोटेंचे वादग्रस्त विधान




आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असणारे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. “जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी त्याला ‘बाजीराव-मस्तानी’ने उत्तर दिले पाहिजे. जो हिंदू मस्तानीला घरी आणेल, त्याला मी एक लाख रुपये रोख आणि चांदीचे कडे बक्षीस देईन,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते मूर्तीचा अभिषेक आणि शंभू महापूजा करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मुस्लिम समुदायावर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत हिंदूंना ‘बाजीराव-मस्तानी’चा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. “जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी बाजीराव-मस्तानी केले पाहिजे. जो हिंदू मस्तानीला घरी आणेल, त्याला एक लाख रुपये रोख आणि चांदीचे कडे बक्षीस देऊ,” असे वक्तव्य मिलिंद एकबोटे यांनी केले. या विधानामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिलिंद एकबोटेंचे विवादांशी जुने नाते मिलिंद एकबोटे यांच्या विधानावरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१८ साली झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात त्यांच्यावर दंगल भडकवणे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते विविध कारणांनी सातत्याने चर्चेत आहेत. जर्सी गायीबद्दलचे अजब दावे पुन्हा चर्चेत नारायणगावमधील या विधानानंतर एकबोटे यांनी गेल्या वर्षी पुणे येथील कार्यक्रमात जर्सी गायीबद्दल केलेल्या विधानांचीही पुन्हा समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी त्यांनी दावा केला होता की, “जर्सी गाय हा डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून तयार झालेला प्राणी आहे. जर्सी गायीच्या दुधामुळे मधुमेह (डायबिटीज) आणि नपुंसकता येते. पुणे शहरात जर्सी गायीच्या दुधामुळेच टेस्ट ट्यूब बेबीचे कारखाने (IVF सेंटर्स) सुरू झाले आहेत आणि तिथे वेटिंग लिस्ट असते.” भारतातील देशी गायीचे महत्त्व सांगताना त्यांनी अर्जेंटिना, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे उदाहरण दिले होते, जिथे केवळ भारतीय वंशाच्या गाईचे दूध विकण्याची परवानगी असल्याचा दावा त्यांनी केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *