![]()
करमाड परिसरात २२ गावांची तहान भागवणारा लहुकी तलाव सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. तलावावर अवलंबून असलेली २२ गावांतील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना, दुसरीकडे तलावाच्या आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांनी तलावात विद्युत पंप टाकून शेततळी भरून घेण्याची स्पर्धाच सुरू आहे. लहुकी प्रकल्पातून सध्या करमाड, गाढे जळगाव आणि दुधड या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह एकूण २२ गावे, तांडे व वाड्या-वस्त्यांना येथून पाणीपुरवठा होतो. दरम्यान, यातून होणारा पाणीउपसा थांबवण्यासाठी तलावातील मोटारी बंद करण्यासाठी आलेल्या भरारी पथकाला या शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. या प्रकरणी महसुलने कठोर पावले उचलत कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. पथकाला माघारी फिरले: ^ भरारी पथकासह आम्ही लहुकी प्रकल्पावर गेलो होतो. या पथकात महसूल, पोलिस, विद्युत विभाग व जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी होते. शेतकऱ्यांनी आम्हाला पंप बंद करू दिले नाहीत. आम्हाला तसेच माघारी फिरावे लागले. – मंदार गाडगीळ, जलसंपदा विभाग
Source link
लहुकी तलाव मृतसाठ्यात; अवैध पाणी उपसा सुरूच:पंप बंद करण्यासाठी गेलेल्या भरारी पथकालाही पिटाळून लावले