![]()
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या बंदला अकोले तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थ्यांसह वैचारिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शुक्रवारी अकोलेत मोर्चा काढला. अगस्ती महाविद्यालयाच्या शैक्षणिक बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. एसएफआय, छात्रभारती आणि डीवायएफआय या युवक संघटनेने आंदोलनाचे नेतृत्व केले. सकाळी अकोले महाविद्यालय ते बसस्थानक अशी रॅली काढण्यात आली. हातात फलक, घोषणा देत विद्यार्थ्यांनी दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, विशाल शिंदे, गणेश ताजणे, सदाशिव साबळे, अच्युत वैद्य, विशाल बोऱ्हाडे, तेजस्विनी माघाडे, अवधूत नवले, श्रीपाद डावरे, शीतल झोळेकर, सुनंदा मेढे, युवराज भांगरे आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी विद्यार्थी नेत्यांनी केंद्र सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणांचा निषेध केला. आंदोलनाचा पुढील टप्पा ठरवण्यासाठी लवकरच तालुक्यातील सर्व विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक होणार आहे. अकोले शहरासह कोतुळ, राजूर, समशेरपूर येथील शाळा-महाविद्यालयांमध ्येही विद्यार्थ्यांची एकजूट निर्माण करून लढा तीव्र करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शैक्षणिक मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने अकोले शहरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.
Source link
लाठीहल्ल्याचे अकोलेत तीव्र पडसाद:विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारविरोधात आक्रोश