![]()
लाडसावंगी | येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्य झामसिंग बाम्हणावत यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा पवार, ग्रामपंचायत सदस्य झामसिंग बाम्हणावत, अंकुश ढोके, प्रमोद भालेराव, अनिल पडूळ, दिवाण पडुळ, पदम बम्हणावत, बंडू पवार, सांडू पडूळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बाबरा | फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथील वीर शिरोमणी स्मारक समिती व सकल राजपूत समाजा तर्फे शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी महाराणा प्रताप सिंह यांचा १२ फूट उंच कांस्य धातूचा बाजार पट्टी परिसरात उभारण्यात आला आहे. परिसातील मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य पुतळ्याची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी राजपूत समाज सेवा संघाचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. आमठाणा| सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सण २००६ से २००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येत कासोद येथील गजानन लॉन्स येथे गेट-टुगेदरचा आनंद लुटला. अनेक वर्षानंतर जुन्या मित्र मैत्रिणींची भेट झाल्याने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री अशोक गरुड उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळले. या प्रसंगी सुधाकर जाधव, नंदू हिरे, प्रमोद जंगले, जनार्दन कुंटे या शिक्षकांची उपस्थिती होती. सोयगाव । तालुक्यातील शिवाजी विद्यालय सावळदबारा शाळेचा दहावीचा निकाल ९९ टक्के लागला आहे. विद्यालयातील विद्यार्थिनी अनुराधा गजानन कोते व वैष्णवी ज्ञानेश्वर वखरे यांनी प्रत्येकी ९३.२० टक्के गुण मिळवत संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. कोमल प्रवीण लोखंडे हिने ९३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर आरती अनिल सुरडकर व श्रद्धा एकनाथ दांडगे यांनी प्रत्येकी ९१.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील, प्राचार्य एन. आर. कोलते पाटील, सचिव रत्नाताई पंजाबराव कोलते पाटील, प्रा. जीवन कोलते पाटील आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Source link
लाडसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी:प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन