Headlines

लासूर बाजारपेठेत बियाण्यांची दुकाने ओस; व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा:पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांकडून केवळ वाणांची चौकशी‎




लासूर स्टेशन यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कापूस, मका, कांद्याला भाव नसल्याने आर्थिक अडचणीत आलेला बळीराजा बाजारपेठेत फिरकत नसल्याने बियाणे, खतांच्या दुकानावर सध्या तरी शुकशुकाट जाणवत आहे. ७ जूननंतर अधिकृत पाऊस पडल्यावरच बाजारपेठेतील मरगळ दूर होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. बाजारपेठेत सध्या शेतकरी फक्त खते बियाण्यांचे भाव व वाणांची चौकशी करीत असल्याचे कृषी विक्रेते संजय कापसे यांनी सांगितले आहे. दरम्यान, लासूर बाजारपेठेतील विविध कृषी विक्रेत्यांकडे कापूस, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या बियाण्यांची विविध वाणे उपलब्ध झाली आहेत. गेल्या वर्षी लांब धाग्याच्या कापसाला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे या कापसाच्या बियाण्याला इतर वाणापेक्षा जास्तीची मागणी असून कोणत्याही वाणाचा तुटवडा नसल्याने फक्त पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी बांधव पाऊस पडल्यावर बियाणे खरेदीसाठी गर्दी करतील, अशी शक्यता व्यापारी वर्गातून केली जात आहे. यंदा कमी पावसाच्या अंदाजाने कमी पाण्यावर येणारी पिके शेतकरी खरेदी करतील असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी पाऊसही लांबतोय, असा आलेला हवामान खात्याचा अंदाज तसेच मागील अवकाळी पाऊस, वादळ वारे, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींमुळे बळीराजा काहीसा अडचणीत आला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांजवळ पैसा नसल्याने अनेकांना कर्ज हाच पर्याय उरला आहे. एकंदरितच शेतकरी एका बाजुला नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या भरवशावर व्यापार करणारे खते आणि बी-बियाण्यांचे व्यापारी ऐन बाजारपेठेतील शुकशुकाटाने अधिक चिंतेत आहेत. महाग बियाणे, रासायनिक खतांमुळे शेतकरी कर्जबाजारी हंगामात आर्थिक चिंता सतावतेय गतवर्षी गारपीट, अवकाळी पाऊस अशा संकटाना पेलताना शेतकऱ्यांचा खिसा खाली झाला आहे. त्यातच खरीप हंगामाची तयारी करताना नांगरणीसाठी अडचणी येत आहे. डिझेल, पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने मशागतीचे दरही वाढले आहेत. मशागत आणि तोंडावर आलेल्या वर सेवा खरीप हंगामात खते, बियाणे आजही अनेक शेतकरी वंचित आहेत. नुकसानभरपाई मिळाली नाही. गतवर्षी झालेल्या नुकसान भरपाईपासून मिळाला नाही, यामुळे आर्थिकदृष्ट्या खचलेला शेतकरी आता बँक कर्ज, उधार, उसणवारी, खाजगी सावकाराकडून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *