Headlines

लैंगिक अत्याचारातील चिमुकलीवर टणक हत्याराच्या जखमा आढळल्या:नसरापूर प्रकरणातील नराधमाच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ




नसरापूर येथे १ मे रोजी लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या ३ वर्षांच्या चिमुकलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. ६५ वर्षीय नराधमाने टणक हत्याराने या जखमा केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. मात्र, भीमराव कांबळे या नराधमाची चौकशी केली असता तो त्या हत्याराबाबत समाधानकारक उत्तरे देत नाही, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणात नराधमाच्या हातामध्ये शेवेचा पुडा दिसत आहे. ती शेव त्याने कुठून खरेदी केली, याबाबतही तो उडवाउडवीची उत्तरे देत असून तपासात सहकार्य करत नाही, असेही पोलिसांनी सांगितले. त्यानंतर विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत १४ मे पर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला आहे. कोठडीची मुदत संपल्याने त्याला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ द्वारे कोर्टात हजर केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *