Headlines

वयाचे बंधन नसून जिद्दीच्या जोरावर राबणारे हात घडवणार स्वतःचे भविष्य:शिक्षण पूर्ण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे भाई सथ्था नाईटस्कूलमध्ये स्वागत



शिक्षणासाठी वयाची अट नसते आणि शिकण्याची जिद्द असेल तर कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, याचा प्रत्यय शहरातील ‘भाई सथ्था नाईट हायस्कूल’मध्ये येत आहे. विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या कष्टकऱ्यांसाठी ही शाळा आशेचा किरण ठरली असून, येथे वयाच

.

दिवसभर पोटापाण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कठोर परिश्रम करायचे आणि रात्रीच्या वेळी हातात पुस्तक घेऊन वर्गात बसायचे, असा आगळावेगळा संघर्ष येथील विद्यार्थ्यांचा आहे. या शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नव्याने प्रवेशित झालेल्या अशाच अनेक जिद्दी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आल रात्रशाळेच्या ‘शिक्षण दूत’ मोहिमेअंतर्गत शहरात विशेष शोध घेऊन ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, नोकरी करणारे युवक आणि विविध छोट्या-मोठ्या व्यवसायातील नागरिकांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

दिवसभर पोटापाण्यासाठी काम करून रात्री कष्टाने शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांमुळेच येथे ‘शिकला तोच घडला’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो, असे प्राचार्य सुनील सुसरे म्हणले.

या सोहळ्यास महादेव राऊत, अमोल कदम, उज्वला साठे, मंगेश भुते, गजेंद्र गाडगीळ यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश भुते यांनी केले, तर आभार गजेंद्र गाडगीळ यांनी मानले. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी व सचिव संजय जोशी यांनी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

४४ वर्षांनी पुन्हा इयत्ता ११ वीत प्रवेश

या वर्षीच्या प्रवेशोत्सवात वयाच्या बंधनाला झुगारून देणारे मुख्य आकर्षण ठरले ते शहरातील ६० वर्षीय सराफ व्यावसायिक प्रमोद बुऱ्हाडे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे १९८२ मध्ये दहावी केल्यानंतर त्यांचे शिक्षण तब्बल ४४ वर्षांपूर्वी सुटले होते. मात्र, उच्च शिक्षणाचा ध्यास उराशी बाळगून त्यांनी पुन्हा इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेतला आहे. पहिल्याच दिवशी हजेरी लावणाऱ्या बुऱ्हाडे यांच्या रूपाने ‘शिकायला वयाचे बंधन नसते’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

एकाच वर्गात सासू-सून अन् बाप-लेक एकत्र : कोठारी या रात्रशाळेत एकाच वर्गात नवरा-बायको, सासू-सून, आई-मुलगी आणि बाप-लेक यांनी एकत्र शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर ‘मासूम’ संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन पायावर उभे केले जाते,असे शाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *