Headlines

प्रवेशोत्सव:बागलाणमध्ये 291 शाळांत पुस्तके वाटप, पुस्तके, गणवेशांचे वितरण; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य‎




बागलाण तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव नवगतांचे स्वागत औक्षण, चॉ कलेट देत, पावलांचे ठसे घेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आले. तालुक्यातील २९१ जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके देण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी चित्रा देवरे यांनी दिली. मुळाणे जिल्हा परिषद शाळेत आमदार दिलीप बोरसे यांनी नवगतांचे स्वागत केले, तर ताहाराबाद येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल येथेही शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. शालेय परिसराची स्वच्छता, वर्गांसमोर आकर्षक रांगोळी, शाळेच्या प्रवेशद्वाराला तोरण, फलक लेखनाने सजविण्यात आले होते. कार्यक्रमास बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांना फुले व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *