Headlines

वयोवृद्धाला लुटणारा एलसीबीच्या जाळ्यात:दुचाकीवर लिफ्ट देवून पळवली होती रक्कम‎




वरुड पोलिस ठाणे हद्दीतील राजुरा बाजार येथे एका ७३ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला दुचाकीवर लिफ्ट देवून त्यांच्याकडील रोख घेवून पोबारा ठोकणारा एक लूटारु एलसीबीने पकडला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी व रोख रक्कम जप्त केली . मनीष अनिल जोशी (३३, रा. पार्वती नगर अमरावती, ह.मु. यश कॉलनी, टॉवर लाईन, अमरावती) असे अटक केलेल्या लूटारुचे नाव आहे. गाडेगाव येथील गणपत बांबल (७३) हे २६ मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शेतीसाठी खत खरेदी करण्याकरिता राजुरा बाजार येथे आले होते. त्याचवेळी चेहऱ्याला दुपट्टा बांधलेला एक तरुण दुचाकी घेवून त्यांच्याजवळ आला. माझे वडील रुग्णालयात भरती आहेत, असे खोटे सांगून त्याने बांबल यांना विश्वासात घेतले आणि स्वतःच्या दुचाकीवर बसवून राजुरा बाजार शाळेजवळ नेले. तिथे पोहोचल्यावर त्याने चिल्लर पैशांची मागणी केली. बांबल यांनी खत खरेदीसाठी आणलेले १० हजार रुपये खिशातील पाकिटातून बाहेर काढताच, लूटारुने त्यांच्या हातातील सर्व रक्कम हिसकावून घेतले आणि दुचाकीवरून वरूडच्या दिशेने पळ काढला. या घटनेप्रकरणी वरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता. एलसीबीचे पीएसआय नितीन इंगोले यांचे पथक तपास करत असताना, त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, हा गुन्हा मनीष अनिल जोशी याने केला असावा व तो माहुली मार्गे मोर्शीकडे जात आहे. त्यामुळे पथकाने मोर्शी मार्गावर त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी जोशीकडून दुचाकी, एक मोबाइल आणि ६ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याने यापुर्वीसुद्धा विविध प्रकारचे चार ते पाच गुन्हे केले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *