Headlines

वरदडी येथील शनि मंदिरामध्ये पहाटे अभिषेक:जन्मोत्सव, सायंकाळी आरती, ‘शनी महाराज की जय’च्या घोषाने परिसर दुमदूमला‎



चांदवड शनैश्वर जयंती शनी अमावास्येनिमित्त तालुक्यातील वरदडी येथील पुरातन शनी मंदिरात शनिवारी (दि. १६) हजारो भाविकांनी शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ओम श्री शनैश्चराय नमः, शनी महाराज की जयच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला. पहाटे पाच वाजेपासून भा

.

उज्जैनचा राजा विक्रमादित्य यांना साडेसाती लागली होती. त्या काळात विक्रमादित्य राजाने याच ठिकाणी शनिदेवाची तपश्चर्या करून त्यास प्रसन्न करून घेतले होते. त्यानंतर राजाने येथे शनिदेवाचे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. हे स्थान शनी – साडेसाती मुक्तिधाम म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे दर्शनासाठी मोठी गर्द होत असते.

शनी अमावास्या व शनी जयंतीच्या दुर्मीळ योगायोगानिमित्त श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील शनी मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली. “शनिदेवा, सर्वांची ईडा-पिडा टळू दे आणि सुख-समृद्धी लाभू दे’, असे साकडे यावेळी भाविकांनी शनी चरणी घातले. शनिवारी पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

शनिवारी पहाटे ५ वाजून ११ मिनिटांनी अमावास्येला प्रारंभ झाल्यानंतर, मुख्य पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराच्या जयघोषात शनिदेवाची महाआरती करण्यात आली. या प्रसंगी शनैश्वर देवस्थान संस्थानचे सर्व विश्वस्त आणि



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *