![]()
तालुक्यातील वाकला जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांची पदे रिक्त असून, ती भरण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेस कुलूप ठोकले होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी भर पावस
.
हातात थाळ्या आणि चमचे घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला शिक्षक द्या, शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मुसळधार पावसातही विद्यार्थी व पालक आंदोलनस्थळी ठामपणे उभे राहिल्याने गावकऱ्यांचा संताप स्पष्ट दिसून आला. दरम्यान, प्रशासनाने तातडीने रिक्त पदे भरली नाहीत, तर सोमवारी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ वाकला येथून थेट छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयावर पायी दिंडी काढणार असल्याची घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली. ७० किलोमीटरचा हा प्रवास करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.