Headlines

वाघिणीच्या हल्ल्यात 4 महिला ठार:चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील भयंकर घटना, जंगलात तेंदूपत्ता तोडत असताना वाघाचा हल्ला




जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात तब्बल 4 महिलांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. या घटनेत इतर काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. गतवर्षी 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) जंगलात वाघाने 3 महिलांचा बळी गेला होता. त्यानंतरही ही दुसरी मोठी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. गुंजेवाही येथील 13 महिलांचा एक समूह शुक्रवारी सकाळी तेंदूपत्ता वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. तेंदूपत्ता वेचण्याचे काम सुरू असताना या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या महिला घाबरल्या व जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटल्या. पण वाघाने 4 महिलांवर झडप घातली. त्यात त्यांचा बळी गेला. इतर महिलांपैकी 1 महिला ओरडतच गावात आली. तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकरी लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे 4 महिलांचे मृतदेह आढळून आले. यावेळी इतर महिला सुखरूप असल्याची माहिती आहे. वनविभागानेही घटनास्थळी पोहोचून स्थितीचा आढावा घेतला. तसेच पुढील तपास सुरू केला. या घटनेत कवडूबाई दादाची मोहुर्ले (45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (46), संगीता संतोष चौधरी (36) व सुनीता कौशिक मोहुर्ले (33) या 4 महिलांचा बळी गेला. यामुळे मोहुर्ले व चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *