Headlines

वाढदिवसाचा अवाजवी खर्च टाळत सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श:विवेक गुल्हाने यांनी दिला दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात, परिसरातून कौतुकाचा वर्षाव



वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो गरजूंच्या मदतीसाठी देण्याचा संकल्प आणि संत गजानन महाराज मंदिराच्या विकासासाठी योगदान देण्याचे आश्वासन देत विवेक गुल्हाने यांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत गजानन महाराज सेवा समिती

.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने होते. प्रमुख अतिथी म्हणून यावली शहीदच्या माजी सरपंच शिल्पा खवले, काशीरामजी जवणे, मनीषा गुल्हाने आणि मिलिंद पाटील उपस्थित होते. गुल्हाने यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो मात्र यावेळी विवेक गुल्हाने यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्यावरील खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचे आश्वासन दिले. तसेच संत गजानन महाराज मंदिरासाठी २१ हजार रुपयांची देणगी देण्याबरोबरच मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठीही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेचे उपस्थितांनी स्वागत केले. गावकऱ्यांच्या वतीने गुल्हाने यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच भारतीय जनता पार्टी आणि स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती यांच्या वतीनेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. यावेळी संस्थेचे विश्वस्त मनोज होले, भास्कर कुरळकर, नरेंद्र खवले, पुंडलिक लेकुरवाळे, सुधाकर लंगडे, विठ्ठलराव साबळे, प्रमोद पाचघरे, विनोद चांदुरे, रवींद्र लंगडे, घनश्याम पिकले, दीपक खवले, विजय भुयार, ऋषिकेष चांगोले, सुनील देशमुख, विजय झटाले, संजय कोहळे, सुधीर जाधव, नागेंद्र तायडे, विलास धोटे, सतीश कोकाटे, विलास राठोड, संदीप अकोलकर, राजन देशमुख, पत्रकार मंगेश तायडे, सुमित कांबळे, मंगेश गाडगे, राजेंद्र तूळे, विनोद इंगळे यांच्यासह गावकरी व संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *