![]()
वाढीव कराबाबत सध्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कर वसुलीत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही नागरिकांनी आपल्या हरकती विहित मुदतीत नगरपरिषद कार्यालयाकडे जमा कराव्यात असे आवाहन नगराध्यक्ष करण ससाणे आणि मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी केले आहे. नगराध्यक्ष करण ससाणे आणि मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सांगितले की सदर वसुली ही शासनाच्या निर्देशानुसार होत आहे की जी दर चार वर्षांनी होणे गरजेचे आहे. प्रत्येक चार वर्षांनंतर घरपट्टीची रिविजन व्हावी हा शासनाचा नियम असून जर रिविजन केली नाही तर शासनाकडून येणारे अनेक निधी बंद होतील अशा प्रकारचे पत्रव्यवहार डीएमए ऑफिसकडून झालेले आहेत. सदर रिविजनच्याच्या नोटिसा ज्या नागरिकांना आलेल्या आहेत त्यामध्ये दोन प्रकारच्या तारखा म्हणजेच दोन वेळेस हरकत घेण्याची संधी प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे. हरकत घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी फक्त वाढीव पट्टीला माझी हरकत आहे असे न म्हणता कोणत्या कारणाने पट्टी वाढली आहे आणि जर त्याचा काही पुरावा असेल तर सदर पुरावा हरकती बरोबर जोडावा. जेणेकरून तारखेच्या वेळेस वेळ वाया जाणार नाही. आज श्रीरामपूर बंदची हाक श्रीरामपूर नगरपरिषदेने गाळेधारक व घरांना दुप्पट तिप्पट कर आकारण्यात आला आहे. तो कर त्वरित कमी करण्यात यावा तसेच मालमत्तेचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे या मागणीसाठी आज रविवार सर्वपक्षीय बंदची हाक दिली आहे. तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुभाष त्रिभुवन, गौतम उपाध्ये, बाबा शिंदे, अरुण नाईक, संतोष डहाळे, उमेश पवार, लखन भगत, कैलास बोर्डे, तेजस गायकवाड, मुक्तार शहा आदींनी केले आहे.
Source link
वाढीव करावर श्रीरामपूरकर संतापले:आज शहर बंदची हाक, चुकीची घरपट्टी किंवा व्यावसायिक कर आकारला तर तत्काळ हरकत घ्या