Headlines

विकसित महाराष्ट्रसाठी राज्यस्तरीय शहरी संवाद:अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांचा सत्कार‎




विकसित महाराष्ट्र २०४७” या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय शहरी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात राज्यातील महापौर, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. मेघा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यांनी पारदर्शक, नागरिकाभिमुख प्रशासनावर भर दिला. या प्रसंगी महापौर श्रीचंद तेजवानी यांचा विशेष सत्कार केला. महापौर तेजवानी यांनी शहराच्या विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञान, स्वच्छता, जलसंवर्धन,पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचे सांगितले. “विकसित महाराष्ट्र २०४७” हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासन, नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक जयराज फाटक उपमहासंचालक रवी रंजन गुरु यांनी डिजिटल गव्हर्नन्स, आर्थिक स्वावलंबनावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी खा.मेघा कुलकर्णी, महापौर श्रीचंद तेजवानी , समीर राजूरकर , रूपाराणी निगम , अश्विनी निगम उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *