Headlines

कडक उन्हातही खैरावचा बंधारा फुल्ल, 5 गावातील शेतीला मिळाले जीवदान:मोडकळीस आलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती, जि.प. सदस्य पृथ्वीराज सावंतांची पाहणी‎




कडक उन्हाच्या झळा बसत असतानाच खैराव येथील बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्याने परिसरातील ४ ते ५ गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी मोडकळीस आलेल्या या बंधाऱ्याने आता कात टाकली असून, उन्हाळ्याच्या तोंडावर उपलब्ध झालेला हा साठा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘जीवदान’ ठरत आहे. जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी या कामासाठी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांनी पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा, बैठका आणि तांत्रिक दुरुस्तीबाबत केलेल्या सूचनांमुळे या बंधाऱ्याच्या दरवाजांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यात आली. यामुळेच उन्हाळ्यातही पाणीसाठा टिकून राहिला असून, स्थानिक पातळीवर जलसंधारणाला मोठी चालना मिळाली आहे. पृथ्वीराज सावंत यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “यंदाच्या खरीप हंगामासाठी हा पाणीसाठा मोठा आधार ठरणार आहे.पाण्याच्या उपलब्धतेमुळे पिकांचे नियोजन सुकर होणार असून, परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .खैरावसह ४- ५ गावांना थेट लाभ. .खरीप हंगामासाठी पोषक वातावरण तयार. .विहिरी व बोअरवेलच्या पातळीत वाढीची शक्यता. .शेती उत्पादन वाढीस मिळणार बळ पाण्याचा फायदा कुणाला विकासकामे वेळेत पूर्ण ^बंधाऱ्यात पाणीसाठा निर्माण झाल्याने ४- ५ गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी आमचा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील. पृथ्वीराज सावंत, जिल्हा परिषद सदस्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *