Headlines

विदर्भात जुलैमध्ये सरासरीपेक्षा २१% अधिक पाऊस:गोंदिया, बुलढाणा अन् यवतमाळमध्ये सर्वाधिक वर्षाव




जुलै २०२६ मध्ये विदर्भात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. या एका महिन्यात विदर्भ उपविभागात एकूण ३७४.१ मिमी पावसाची नोंद झाली, जी सामान्य सरासरी (३०९.३ मिमी) पेक्षा २१ टक्के अधिक आहे. अमरावती जिल्हा वगळता विदर्भातील उर्वरित सर्व ११ जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ५६ टक्के अधिक (६६८.३ मिमी) पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पश्चिमेकडील बुलढाणा आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा प्रत्येकी ५१ टक्के अधिक पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यात ३३ टक्के अधिक (४८२.६ मिमी), वर्धा जिल्ह्यात २१ टक्के अधिक (३३०.५ मिमी) आणि गडचिरोली जिल्ह्यात १९ टक्के अधिक (५१९.८ मिमी) पावसाचा जोर चांगला राहिला. वाशीममध्ये १४ टक्के अधिक (२७५.३ मिमी), नागपूरमध्ये ६ टक्के अधिक (३३५.२ मिमी), अकोल्यात ५ टक्के अधिक (२३३.५ मिमी) तर चंद्रपूर जिल्ह्यात २ टक्के अधिक (३७१.१ मिमी) पाऊस झाला. दुसरीकडे, अमरावती जिल्ह्याला मात्र काहीसा फटका बसला. तेथे सरासरीच्या तुलनेत ८ टक्के कमी (-८%) पाऊस नोंदवला गेला. अमरावतीत २६८ मिमी सरासरीच्या तुलनेत २४६.६ मिमी पाऊस पडला. जुलै महिन्यातील या दमदार पावसामुळे विदर्भातील प्रमुख धरणे आणि जलाशयांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतीकामांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काळात पाण्याची उपलब्धता चांगली राहण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *