![]()
जिल्ह्यासह तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना वेळेत स्कूलला पोहोचण्यासाठी मागील वर्षी ९८४ स्कूलबस गाड्यांनी परवाना घेतला होता. तर यंदाच्या वर्षी १२०० स्कूल बस गाड्यांनी परवाना घेतला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी २१६ स्कूल बस संख्येत वाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्र मोटार कर अधिनियमानुसार खाजगी वाहनाकरिता २५०० रुपये प्रतिआसन प्रतिवर्ष इतका आहे, तर शाळेच्या मालकीची अथवा शाळेने भाड्याने घेतलेल्या वाहनाकरिता १०० रुपये प्रतिआसन प्रतिवर्ष इतका असताना मनमानी भाडे आकारणीने पालकांच्या आर्थिक लुटीसह क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी स्कूल बसमध्ये स्कूल बस चालक बसवत असल्याने विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. दमछाक रोखण्यासाठी प्रशासन, शिक्षण संस्थेबरोबरच पालकांवर दमछाक रोखण्यासाठी आव्हान निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यासह अकरा तालुक्यात दि. १५ जून रोजी स्कूल सुरू होत आहे. स्कूलचा प्रवास सुखकर होण्यासाठी यंदाच्या वर्षी २१६ विद्यार्थी स्कूल बसमध्ये वाढ झाली आहे. मात्र बस चालकांकडून विद्यार्थी स्कूल बस प्रतिआसन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केली जात आहे. अक्षरशः १५ सीट क्षमता असणाऱ्या स्कूलबसमध्ये ३० विद्यार्थी भरले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे विद्यार्थी सुरक्षा समिती, सर्व स्कूल बस मालक-चालक, शालेय स्कूल शिक्षण समिती, शिक्षण संस्था, प्रादेशिक परिवहन कार्यालयासह पालकांनी देखील अधिनियमाप्रमाणे नियमाचे पालन जबाबदारीने करून घेणे गरजेचे आहे. मात्र याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना मात्र आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा या गंभीर समस्येकडे जबाबदार अधिकाऱ्यांसह शिक्षण संस्था लक्ष देणार की नाही, यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, पालक, शिक्षण संस्था, वाहक यांच्यावर देखील कार्यवाही करण्यात यावी. मोटार वाहन अधिनियम प्रमाणे स्कूल बस पासिंग, फायर टेस्टिंग व्हिशर, योग्यता प्रमाणपत्र, गाडीवर स्कूल बस ठळकपणे आवश्यक आहे. स्कूलचे नाव, रूट पुढच्या आणि पाठीमागच्या काचेवरती, पाठीमागे व पुढे मार्ग क्रमांक, कोणत्या कोणत्या ठिकाणी गाडी थांबणार याचा बोर्ड आवश्यक आहे. दरवाजामध्ये चढताना मुलांना हँडल, प्रथम उपचार पेटी आवश्यक आहे. ड्रायव्हर केबिन स्वतंत्र, १५ वर्षापेक्षा जुनी गाडी नको. स्पीड लिमिटर ५० किलोमीटर, आवश्यक आहे. तालुका २०२५ २०२६ अक्कलकोट ४५ ५५ बार्शी ७२ १०७ मंगळवेढा २५ ४४ मोहोळ ४३ ५३ पंढरपूर १४० १५६ द. सोलापूर ३५ ३८ उ. सोलापूर ३३ ५५ माढा ५९ ५१ सांगोला ४० ६२ करमाळा १७ ४५ माळशिरस ५० ५२ Share with facebook ^शाळेच्या मालकीची अथवा शाळेने भाड्याने घेतलेल्या वाहनाकरिता शालेय वाहतूक समितीने प्रति किलोमीटर भाडे ठरवून द्यावे. एसटी बससाठी प्रति महिना पास २८५ रुपये आहे. एसटी बससाठी प्रति महिना पास दराच्या दुप्पट करण्यास काही हरकत नाही. – अनिल वाघमोडे, पालक, मोहोळ शाळेमध्ये तक्रार पेटी ठेवण्याबाबत शासनाने ५ मे २०१७ च्या परिपत्रकानुसार तक्रार पेटी, घरगुती, लैंगिक हिंसाचार कायद्याबाबत, चांगला वाईट स्पर्श जनजागृती, महिला प्रतिनिधींची नेमणूक, भिंतीवर फलक, सीसीटीव्ही अशा विविध माध्यमातून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, कर्मचारी नियुक्ती अनुषंगाने काळजी घेणे, विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन आणि नियमित आढावा बैठक घेणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन आवश्यक ^शाळा चालकांनी वाहतूकदारांसोबत शालेय विद्यार्थ्यांची वाहतुकीबद्दलचा करार करावा. करार करण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेची आहे. करार करताना संबंधित वाहनाच्या परवान्यावर स्कूल बस अशी नोंद असल्याची खात्री करावी. – राहुल खंदारे, मोटर वाहन निरीक्षक, सोलापूर तक्रार पेटी व इतर उपाययोजना वाहनांची आकडेवारी
Source link
विद्यार्थी वाहतूक यंदा सुकर, मागील वर्षीच्या तुलनेत 216 बसेसची वाढ:यंदाच्या वर्षी 1200 स्कूल बस गाड्यांना मिळाला परवाना