![]()
मोहोळ शहराची सुमारे ५० हजार लोकसंख्या आहे. शहराला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सिना नदीवरील आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाणी संपण्या अगोदरच पांटबंधारे विभागाच्या माध्यमातून घाटणे बॅरेज बंधाऱ्यातून मागील ४ दिवसापासून पाणी सोडण्यात आल्याने काही महिन्या पुरते तर मोहोळ शहराचे जलसंकट टळल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मोहोळ शहराला ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागायत सीना नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या आष्टे कोळगाव बंधाऱ्यातुनच पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी संपले अथवा बोगद्यातून येणारे पाणी संपले की मोहोळ शहराला दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. सुदैवाने मागील वर्षी समाधान कारक पाऊस झाल्याने नदी परिसरातील विहीरी बोअर सह शहर परिसरातील बोअरचे पाणी अद्याप सुरू आसल्याने शहराला पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता पाहता दि. २८ एप्रिल ला भरलेल्या आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाणी एका महिन्यातच झपाट्याने पाणी कमी झाले होते. यंदाच्या वर्षी जाणवणारा कडक उन्हाळा अशा उन्हाळ्याच्या परिस्थितीत शहराला पाणीटंचाईला सामोरे जाण्या अगोदरच घटने बॅरेज बंधाऱ्यांमध्ये अडविण्यात आलेले पाणी मागील चार दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून आष्टे बंधाऱ्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात दोन मीटर पाणी आले असून ते पाणी किमान दिड महिना जाईल अशी आशा असल्याने सद्यस्थितीला ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांवरील आलेले जल संकट टळले आहे. ^मोहोळ शहराला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या आष्टे कोळेगाव बंधाऱ्यांमधील पाणी संपत आल्याने घाटणे बॅरेज बंधाऱ्यामध्ये साठविण्यात आलेले २० दलघमी पाणी अष्टे बंधाऱ्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यात २ मीटर पाणी आले आहे. ते पाणी जवळपास दीड महिना शहराला पुरेल. याशिवाय भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी परिसरातील वीज पुरवठा खंडीत करून जनावरांच्या पाण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ४ तास करण्यात आला आहे. – दीपक नाईकनवरे, उप अभियंता जवळपास दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा
Source link
आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात 20 दलघमी पाणी सोडले:50 हजार लोकसंख्येच्या मोहोळला मिळणार दिलासा, बंधाऱ्यात साचले 2 मीटर पाणी