Headlines

बदलला पक्षांचा रंग, कायम राहिली घराण्यांची ताकद:प्राजक्त तनपुरेंच्या विधान परिषदेवरील बिनविरोध निवडीनंतर अधोरेखित झाले वास्तव‎



माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची महायुतीच्या पाठबळावर विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर अहिल्यानगरच्या राजकारणात एक महत्त्वाचा संदेश अधोरेखित झाला आहे. तो म्हणजे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढले असले, तरी त्यामागे पूर्णपणे नव्या नेतृत्वाचा उदय

.

भाजपच्या छत्राखाली एकवटली ताकद राजकीय जाणकारांच्या मते, जिल्ह्यात भाजपचे वाढते वर्चस्व हे केवळ पक्ष संघटनेच्या विस्तारामुळे घडलेले नाही. उलट विविध पक्षांमध्ये प्रभाव निर्माण केलेले स्थानिक नेते आणि त्यांची राजकीय ताकद भाजपच्या छत्राखाली एकवटत गेली. त्यामुळे मतदारांसमोर अनेक ठिकाणी चेहरे तेच राहिले, मात्र त्यांच्या हातातील झेंडे बदलले.

जिल्ह्यात अनेक प्रस्थापित राजकीय घराण्यांची तिसरी पिढी आज राजकारणात आहे. मात्र बहुतांश नेतृत्व जिल्हास्तरावरील प्रभाव निर्माण करण्यात अपयशी ठरले. याउलट विखे पाटील घराण्याने गेल्या पाच दशकांहून अधिक काळ जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *