Headlines

ससून रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण:रुग्णाच्या नातेवाईकाने चित्रीकरणास मनाई केल्याने घडला प्रकार




पुणे येथील ससून रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. रुग्णावर तातडीचे उपचार सुरू असताना नातेवाईकाने मोबाईलवर चित्रीकरण करण्यास मनाई केल्याने हा प्रकार घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धनराज कृष्णा पिल्ले (वय ३०, रा. घोरपडी गाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात एका रुग्णाला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय कक्षातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रुग्णाला तातडीने उपचार (सीपीआर) देत होते. त्याचवेळी रुग्णाचा नातेवाईक असलेल्या आरोपी धनराज पिल्ले याने मोबाईलवरून चित्रीकरण सुरू केले. डॉक्टरांनी त्याला चित्रीकरणास मनाई केली असता, आरोपीने वैद्यकीय कक्षात गोंधळ घातला. आरोपीने डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आरोपीला रोखले आणि पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सदनिकेचे कुलूप तोडून १९ लाखांचा ऐवज चोरी बिबवेवाडीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा १८ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बिबवेवाडीतील भाग्यश्रीनगरमधील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदाराची सदनिका बंद होती. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून ७० हजारांची रोकड, सोने-चांदीचे दागिने असा १८ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तपास करत आहेत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *