मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मारामारी आणि वादाच्या घटना समोर येत असतानाच आता एका अजब आणि धक्कादायक प्रकरणामुळे मध्य रेल्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका तिकीट तपासनिसाने (TC) दंड भरण्यासाठी पैसे नसले
.
सदर घटना २५ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मशीद बंदर स्थानकादरम्यान घडल्याचा दावा सचिन कुमार मौर्य या प्रवाशाने केला आहे. लोकल ट्रेनमधून उतरत असताना टीसी एका विनातिकीट प्रवाशाकडे तिकिटाची चौकशी करत होता. संबंधित प्रवाशाकडे दंडाची रक्कम भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. यामुळे संतापलेल्या टीसीने त्याला धावत्या डब्यातून थेट लाथ मारून बाहेर फेकून दिले. यामुळे तो प्रवासी थेट रेल्वे रुळांवर कोसळला, असा आरोप करण्यात आला आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर सचिन कुमार मौर्य यांनी २५ जुलै रोजी सकाळी ९:२६ वाजता रेल्वेच्या ‘१५१२’ या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून रीतसर तक्रार नोंदवली.
रेल्वेचे स्पष्टीकरण : प्रवाशाने स्वतःच मारली उडी
प्रवाशाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केली असता वेगळीच माहिती समोर आली आहे. टीसीने आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
“भायखळा रेल्वे सुरक्षा दलाच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, संबंधित टीसी डब्यात चढताना आणि अवघ्या ४ ते ५ सेकंदांत परत खाली उतरताना दिसत आहे. टीसीला पाहताच तो विनातिकीट प्रवासी घाबरून डब्याच्या दुसऱ्या बाजूने स्वतःच खाली उतरला अथवा उडी मारली. अवघ्या ४ ते ५ सेकंदांच्या कालावधीत डब्यात प्रवेश करणे, प्रवाशाला शोधून लाथ मारणे आणि पुन्हा खाली उतरणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. फुटेजमध्ये मारहाणीचा किंवा धक्का दिल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही,” असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांमधील वादातून थेट हत्येची घटना घडली होती, तर मारामारीचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच टीसीवरील लाथ मारल्याच्या या आरोपांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि रेल्वेतील तणावपूर्ण वातावरणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
हे ही वाचा…
धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता:पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या आणि वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला थेट ‘घरचा आहेर’ दिला आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी १५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता, तर देशात लाठीचार्ज अन् संतापाची लाट पसरली नसती,” अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. सविस्तर वाचा…
भाजपकडून ‘धन्यवाद मोदीजी’ उपक्रमाचे आयोजन:केंद्र सरकारच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील युवा पिढीच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. मात्र, विरोधी पक्षांकडे कोणतीही ठोस दृष्टी नसल्याने ते आंदोलने, अपप्रचार आणि ‘फेक नॅरेटिव्ह’च्या आडून तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या युवककेंद्रित धोरणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सत्य जनतेसमोर आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने २७ जुलै रोजी मुंबईत ‘धन्यवाद मोदीजी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…