Headlines

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आवडी,क्षमता,कौशल्ये अन् गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत:‎एमआयटीमध्ये करिअर मार्गदर्शन आणि एनडीए तयारी व प्रशिक्षण अनावरण समारंभ



विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना केवळ पारंपरिक पर्यायांचा विचार न करता आपल्या आवडी, क्षमता, कौशल्ये आणि बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन करिअर निवडले पाहिजे, जर आपल्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत

.

वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल कॅम्पसमध्ये एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या एनडीए परीक्षा तयारी आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनावरण समारंभ संपन्न झाला. या वेळी आयोजित दहावीनंतरचे करिअर विषयक चर्चासत्रात प्रसिद्ध शिक्षणतज्ञ व करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर व कर्नल डी. के. उपाध्याय यांनी करिअरच्या विविध पर्यायांविषयी आणि संरक्षण क्षेत्रातील करिअरविषयी विशेष मार्गदर्शन केले.

या वेळी प्रमुख पाहुणे विवेक वेलणकर, वाखरी एमआयटी संकुलाचे सहसंचालक कर्नल डी. के. उपाध्याय, विश्वशांती गुरुकुलचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, शिबानी बॅनर्जी व ज्युनिअर कॉलेजचे योगेश नागपाल उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉ. स्वप्नील शेठ यांनी केले. यानंतर कर्नल डी. के. उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते विवेक वेलणकर यांनी यावेळी त्यांनी एनडीए प्रवेश प्रक्रिया, परीक्षा, एसएसबी मुलाखत याचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्राची बिडवे यांनी केले. वीरेंद्र बावस्कर यांनी आभार मानले.

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना योग्य करिअरची योग्य दिशा मिळावी तसेच देशसेवेबरोबरच संरक्षण क्षेत्रातील उच्च करिअरच्या संधी याविषयी आवश्यक मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *