Headlines

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळवावे- बोरुडे:दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; करिअरविषयक मार्गदर्शन




आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आवडत्या क्षेत्रात यश संपादन करावे. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असून याच काळात त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा निश्चित होत असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केले. मानवता सेवा संस्थेच्यावतीने आयोजित दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर, उच्च शिक्षण मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी किरण बारस्कर, डॉ. भूषण तोडमल, युवराज औंधकर, देवा गुप्ता, डॉ. अजय पवार, आदित्य काकडे, धीरज लोणारे, अक्षय वाणी, सार्थक कातोरे आदी उपस्थित होते. किरण बारस्कर म्हणाल्या, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांनुसार योग्य दिशा मिळावी यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. मानवता सेवा संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशा दिली जाते. कार्यशाळेत डॉ. भूषण तोडमल, युवराज औंधकर, देवा गुप्ता आणि डॉ. अजय पवार यांनी विद्यार्थ्यांना करिअर, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा याविषयी मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये केवळ पारंपरिक शिक्षण नव्हे तर स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा, क्रीडा आणि उद्योजकता अशा अनेक क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज पारंपारिक शिक्षणापलीकडेही संधी कार्यशाळेदरम्यान डॉ. भूषण तोडमल, युवराज औंधकर, देवा गुप्ता आणि डॉ. अजय पवार यांनी विद्यार्थ्यांना करिअर, उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये केवळ पारंपरिक शिक्षण नव्हे तर स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा, क्रीडा आणि उद्योजकता अशा अनेक क्षेत्रांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *