Headlines

विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावर!:आमचे उमेदवार विकले गेले, भाजपच्या नगरसेवकांनीही पैसे मागितले; वडेट्टीवारांचा आरोप




विधान परिषद निवडणुकीसाठी आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. अनेक वेळेस बिनविरोध निवडणूक झाल्यात नाही झाल्या असे काही नाही. भाजपच्या नगरसेवकांनी सुद्धा पैसे मागितले आहेत, ते पैसे देणार कुठून? हा धंदा झालेला आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचे झाले आहे. तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनातून देशात परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. त्यांच्यासोबत तरुण एकवटले आहे, ही युवाशक्ती आता शांत बसणार नाही. रोजगारासाठी भटकणारा तरुण देशाला उद्धवस्त होताना बघणार नाही. आता परिवर्तन होत या सरकारला जावे लागेल अशी परिस्थिती आता निर्माण होईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकार ओबीसींच्या बाजूने नाही विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारची भूमिका कधीच ओबीसीच्या बाजूने राहिलेली नाही, मत घेण्यापुरते ते ओबीसींना जवळ करतात. सर्वांनाच ओबीसींच्या सवलती दिल्या तर मग त्या स्पर्धेत कसे टिकणार. आम्हाला स्कॉलरशिपमध्ये 100 टक्के सवलत द्यावी. ओबीसींमध्ये फार गरीब समाज आहेत. इतरांना काही देऊ नका असे आमचे म्हणणे नाही, पण आमच्या वाट्याला काही तरी येईल असे आम्हाला द्या ही ओबीसींची मागणी आहे. लोकसंख्येच्या आधारावर त्यांना निधी दिला जावा. विधान परिषदेत 70 टक्के मतदार विकले जातात विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राजकारणाचा बाजार झाला आहे. रस्त्यावर बसून वाटेल ते घेता येते ही खात्रीच भाजपला झाली आहे त्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार करत त्यांनी पैसे गोळा केले आहेत. घोटाळ्याचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. हा देश विकला गेला आहे. जर विधान परिषदेचे उमेदवार विकले गेले तर दोघांवरही कारवाई झाली पाहिजे, पैसे घेणाऱ्यावर आणि देणाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे. उमेदवार उभे राहण्यासच तयार नाही, कारण प्रचंड शक्तीपुढे 10 आणि 15 लाख रुपयांचे मार्केट उभे झाले तर कोण खर्च करेल. सुधीर मुनगंटीवार यांनी तर काल विधान परिषद रद्द करावी अशी मागणी केली आहे. नगरसेवक निवडून येतो तो कोणाचाच नसतो विधान परिषदेत जो पैसे देईल त्याला 70 टक्के मतदार विकले जातात, 30 टक्के मतदार चांगले असतात. प्रत्येक पक्षाचे नगरसेवक आपल्या उमेदवारांना पैसे मागत आहेत, भाजपच्या नगरसेवकांनीही पैसे मागितले आहेत. विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवेल असे झाले आहे. सत्ताधारी हिटलरच्या विचारांचे विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, देशाचा जीडीपी 7.7 दाखवला जात आहे, हे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. देशातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे सर्व सुरू असताना आपली प्रगती होत आहे असे म्हणणे योग्य नाही. सत्ताधारी हे हिटलरच्या विचाराचे आहेत. एखादा सत्यासाठी लढत असेल तर त्याला दाबण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. सरकारविरोधात जे बोलले त्या 17 वर्षीय पोरांना हे सोडत नाही मग दिपकेंना भीती वाटणं सहाजिक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *