Headlines

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू:‘वर्षा’वर भाजपची खलबते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत



विधान परिषदेच्या १७ जागांच्या घोषणेनंतर महायुतीतील जागावाटपाचा अंतर्गत संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. सातारा-सांगलीसाठी भाजप व शिंदे गट, तर कोकणच्या जागेसाठी शिवसेना आणि अजित पवार गटात थेट दुफळी निर्माण झाली आहे. या वाढत्या राजकीय तिढ्यादरम्यान, मुख्

.

दुसरीकडे, जागावाटपाचा हाच पेच सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. विधान परिषदेच्या १७ जागांवरून महायुतीत राजकीय चढाओढ तीव्र झाली असून अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

शिंदे यांचा दिल्ली दौरा नगरविकास बैठकीसाठी?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शिंदे हे नगरविकास विभागाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. मात्र, बैठकीपूर्वीच शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले.

‘वर्षा’वर महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा

मुंबईत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. यात विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला व संभाव्य उमेदवारांच्या नावांवर तसेच प्रलंबित महामंडळांच्या वाटपावरही चर्चा झाली. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणती महामंडळे द्यायची, याबाबत भाजपने भूमिका निश्चित केल्याचे समजते.

कोकणातील जागेवर शिवसेनेचाच दावा

कोकणात शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांत आम्ही ३०० चा टप्पा पार करतो. आमच्यापाठोपाठ भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येतो. आमचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे. -उद्योगमंत्री उदय सामंत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *