Headlines

चांभुर्डी अवैध मुरूम उपसा प्रकरणात तिसऱ्यांदा पंचनामा:तहसीलदार डोंगरे यांच्या आदेशामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले‎




तालुक्यातील चांभुर्डी येथील शासकीय जमिनीतून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध मुरूम उपसा प्रकरणात महसूल प्रशासनाने अखेर पुन्हा एकदा कारवाईचे पावले उचलली आहेत. तक्रारदार श्रीरंग साळवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार १५ मे २०२६ रोजी संबंधित जागेचा तब्बल तिसऱ्यांदा पंचनामा करण्यात आला. यापूर्वी झालेल्या दोन पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आक्षेप घेत साळवे यांनी सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार मंडल अधिकारी चौधरी, तलाठी किरण फातले, ग्रामसेवक प्रवीण साळुंके आणि महसूल कर्मचारी संतोष खंडागळे यांच्या पथकाने घटनास्थळी जात जागेची बारकाईने मोजणी केली. या प्रक्रियेवेळी माजी सरपंच भाऊसाहेब पुरी, पोलीस पाटील कल्याण उदार, पप्पू नाणेकर, संकेत ढगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय जमिनीवरील या दरोड्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन वेळा पंचनामा होऊनही कारवाई लांबणीवर पडल्याने महसूलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता तिसऱ्या पंचनाम्यानंतर तरी सरकारी तिजोरीची लूट करणाऱ्या राजकीय वरदहस्त लाभलेल्या भूमाफियांवर तहसीलदार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *