Headlines

विनापरवाना टॅक्सीसेवा देणाऱ्या ‘रॅपिडो’च्या संस्थापकांवर गुन्हा:आरटीओने डमी राइडद्वारे केले स्टिंग ऑपरेशन




शहरात बेकायदा धावणाऱ्या ‘रॅपिडो’ बाइक टॅक्सी कंपनीविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोठा दणका दिला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही विनापरवाना ॲपद्वारे प्रवासी वाहतूक सुरू ठेवून शासनाची व प्रवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी रॅपिडोचे संस्थापक, संचालकांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक अभिजित अण्णासाहेब जगनाडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपिडो कंपनीचे संस्थापक ऋषिकेश एस. आर., पवन गुटुपल्ली आणि अरविंद संका (सर्व रा. कॉर्पोरेट ऑफिस, बेंगळुरू आणि रजिस्टर्ड ऑफिस, हैदराबाद) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. रॅपिडो ॲपच्या माध्यमातून खाजगी दुचाकींवरून अवैध प्रवासी वाहतूक सुरू होती. या कंपनीकडून ॲपवर नोंदणी करणाऱ्या चालकाची कोणतीही चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी किंवा कागदपत्रांची शहानिशा केली जात नव्हती. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. महाराष्ट्र मोटार वाहन ॲग्रिगेटर नियम २०२६ आणि बाइक टॅक्सी नियम २०२५ चे उघडपणे उल्लंघन केले. ३ चालकांवर दंड अवैध वाहतुकीचा पर्दाफाश करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक अभिजित जगनाडे, सहायक निरीक्षक अरुणा लहामगे आणि गंगाराम भागडे यांनी २१ आणि २२ जुलै रोजी कार्यालयातील चालकाच्या नावे ॲपवरून ३ राइड बुक केल्या. यामध्ये मनोज जोशी, अमीर खान आणि शौनक गोरे या चालकांना डमी राइडद्वारे पकडण्यात आले व त्यांच्यावर दंडात्मक चलान कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता परिवहन आयुक्त कार्यालयाने रॅपिडोचा परवानगीचा अर्ज आधीच फेटाळला आहे. याविरोधात कंपनीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, १३ जानेवारी २०२३ रोजी न्यायालयाने ॲप बंद करण्याचे निर्देश दिले. त्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही रॅपिडोची याचिका फेटाळली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *