![]()
छत्रपती संभाजीनगर येथील महसूल प्रबोधिनीच्या कामकाजाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रशिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीचे उपक्रम तसेच प्रलंबित बाबींची माहिती त्यांनी यावेळी घेतली. या बैठकीत महसूल विभागातील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची सद्यस्थिती तपासण्यात आली. प्रशिक्षण अधिक प्रभावी व परिणामकारक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिल्या. तसेच प्रशिक्षणामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महसूल प्रबोधिनीमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेताना, कार्यपद्धतीत सुधारणा करून प्रशासन अधिक गतिमान करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपायुक्त (महसूल) रिता मेत्रवार, अप्पर जिल्हाधिकारी तथा संचालक, महाराष्ट्र महसूल प्रबोधिनी डॉ. शेषराव सावरगावकर, तहसीलदार महेश पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Source link
विभागीय आयुक्तांकडून महसूल प्रबोधिनीचा आढावा:प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे निर्देश