Headlines

विरोध झुगारून ‘माऊली’मध्येच आमदार पाचपुतेंचा जनता दरबार:254 अर्जांवर चर्चा, नागरिकांचा प्रतिसाद; विविध विभागांचे अधिकारी एकाच छताखाली‎



विरोधकांनी केलेल्या विरोधाची पर्वा न करता आमदार विक्रम पाचपुते यांच्या पुढाकारातून सोमवारी (१० ऑगस्ट) ‘माऊली’ संपर्क कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला. जनता दरबार शासकीय कार्यालयातच घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, हा विरोध झुगारू

.

विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने नागरिकांनी आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. जनता दरबाराला तहसीलदार सचिन डोंगरे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, गटविकास अधिकारी राणी फराटे, प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, भगत मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विजय होके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील नागरिकांकडून शासकीय कामे, स्थानिक समस्या आणि विकासकामांशी संबंधित तब्बल २५४ अर्ज प्राप्त झाले.

संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांच्या प्रश्नांवर कार्यवाही करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तहसील, पोलीस, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम यांसह विविध विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिकांचे हेलपाटे कमी होऊन वेळेची बचत होत असल्याचे चित्र दिसून आले. जनता दरबाराच्या ठिकाणावरून झालेला विरोध आणि त्यानंतर मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद यामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. जनता दरबार कुठे होतो यापेक्षा नागरिकांच्या प्रश्नांवर किती प्रभावीपणे कार्यवाही होते, हा मुद्दा महत्त्वाचा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. प्राप्त अर्जांवर संबंधित विभागांकडून तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

विरोधापेक्षा सहभागी व्हा विरोधकांनी जनता दरबाराला विरोध करण्यापेक्षा त्यात सहभागी होऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत प्रशासनासोबत समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आ. पाचपुते यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *