Headlines

वीज देणाऱ्या हातांची ‘प्रकाशगाथा’!:आभा शुक्ला, लोकेश‎चंद्र यांच्या हस्ते प्रकाशन‎




वीजपुरवठ्याच्या पलीकडे जाऊन माणसांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महावितरणच्या मानव संसाधन विभागाची सव्वा वर्षांची वाटचाल आता पुस्तकाच्या रूपात दस्तऐवजीकरण झाली आहे. ‘प्रकाशगड’ मुख्यालयात शुक्रवारी ‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ या पुस्तकाचे प्रकाशन ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते झाले. कर्मचारी कुटुंबांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्या आर्थिक तरतुदीत करण्यात आलेली वाढ आणि त्याची अंमलबजावणीही पुस्तकातून मांडण्यात आली आहे. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक राजेंद्र पवार यांनी विविध कर्मचारीभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून मानव संसाधन विभागाला लोकाभिमुख आणि संवेदनशील चेहरा मिळवून दिला. याप्रसंगी मुख्य अभियंता मंगेश कोहाट, मुख्य अभियंते सुनील काकडे, दीपक कुमठेकर, राजेश नाईक, दत्तात्रेय बनसोडे, सुंदर लटपटे, चंद्रमणी मिश्रा, अरविंद बुलबुले, ज्ञानेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. महावितरणच्या मानव संसाधन विभागाने राबविलेल्या उपक्रमांची केवळ माहिती न देता त्यामागची दृष्टी, दिशा आणि कर्मचारीभिमुख कार्यपद्धती शब्दबद्ध करण्याचे काम उपमुख्य जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी केले. विविध उपक्रमांची माहिती संकलित करून त्याला सुसंगत स्वरूप देत त्यांनी ‘प्रकाशगाथा’चे लेखन व संपादन केले. सुरक्षा अभियान, कर्मचारी सन्मान, महिला सक्षमीकरण, कर्मचारी कल्याण, प्रशिक्षण, भरती, क्रीडा आणि कौटुंबिक उपक्रम अशा विषयांना एका सूत्रात गुंफत महावितरणच्या मानव संसाधन विभागाच्या वाटचालीचे दस्तऐवजीकरण या पुस्तकातून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *