Headlines

वेरूळ घाटामध्ये झाड कोसळल्याने 30 मिनिटे वाहतूक झाली विस्कळीत:वाहनधारक ताटकळले, प्रशासनाकडून तातडीने झाड हटवून मार्ग मोकळा‎



तालुक्यातील वेरूळ घाटात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतचे एक मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. झाड थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे ३० मिनिटे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.

.

बुधवारी रात्री अचानक हवामानात बदल होऊन परिसरात जोरदार वारे व पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याचा फटका घाट परिसरातील अनेक झाडांना बसला. त्यापैकी एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन, वन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यंत्रसामग्री व कर्मचाऱ्यांच्या मदतीने पडलेले झाड तातडीने हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. काही तासांच्या प्रयत्नानंतर रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *