Headlines

शिऊरला जि.प. शाळेच्या छताचा भाग कोसळला:बुधवारी रात्री पाऊस झाल्याने अनर्थ टळला; शाळा दुरुस्तीची पालकांची मागणी‎




येथील धनगर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या पडवीचे छत पहिल्याच मुसळधार पावसात बुधवारी रात्री अचानक कोसळले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे मोठी हानी टळली; यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळेच्या इमारतीची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झाली होती. छतातून पावसाचे पाणी सतत झिरपत होते. याबाबत शाळेच्या शिक्षकांनी ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाकडे लेखी व तोंडी स्वरूपात वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे छतामध्ये पाणी मुरले आणि रात्रीच्या सुमारास संपूर्ण पडवी कोसळली. गुरुवारी सकाळी पालकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. सध्या या शाळेची उर्वरित इमारतही अत्यंत धोकादायक स्थितीत उभी आहे. अशा परिस्थितीत आपल्या पाल्यांना शाळेत कसे पाठवायचे? असा सवाल पालकांकडून केला जात आहे. शिक्षण विभागाने तातडीने या दखल घेऊन चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांसाठी पर्यायी सुरक्षित बसण्याची सोय करावी, अशी मागणी आहे. २००९ मध्ये शाळेचे बांधकाम शिऊर येथील धनगर वस्तीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम २००९ करण्यात आले होते. येथे पहिली ते चौथीचे वर्ग असून, ३० विद्यार्थी शिक्षण घेतात. १६ वर्षांतच छत कोसळल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *