Headlines

वैजापूर येथील देवी दाक्षायणी मंदिराच्या 151 एकर इनामी जमिनीचा लिलाव:गतवर्षीच्या तुलनेत यंदा 39 हजारांची वाढ, तिजोरीत 10 लाख 12 हजारांची भर‎



वैजापूर तालुक्यातील ग्रामदैवत श्री देवी दाक्षायणी माता मंदिराच्या मालकीच्या २८५ एकर इनामी जमिनीपैकी १५१ एकर जमीन क्षेत्राचा जाहीर लिलाव मंगळवारी अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडला. वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या प

.

देवी दाक्षायणी मातेची एकूण २८५ एकर इनामी जमीन आहे. लिलाव झालेली १५१ एकर जमीन वगळता उर्वरित १३४ एकर जमिनीचा वापर लोककल्याण आणि मंदिराच्या कामांसाठी केला जातो. मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एकर जमीन पाझर तलावात गेली आहे. ४२ एकर जमीन मंदिरातील वाजंत्री, चौघडा आणि वाद्यकाम करणाऱ्या सेवाकऱ्यांना मालगुजारी म्हणून देण्यात आली आहे.

शिवारांनुसार असा झाला १५१ एकर जमिनीचा लिलाव मंदिराच्या एकूण जमिनीपैकी लिलाव झालेल्या १५१ एकर क्षेत्रात वेगवेगळ्या शिवारांतील जमिनींचा समावेश आहे. यात प्रामुख्याने, शहाजतपूर शिवार (मावलाय गट) – ३३ एकर, वैरागड शिवार (नागेश्वर बाबा) – ८ एकर, धोदलगाव शिवार – १८ एकर, इनामी हडकी गट (घुमट व चिकणीसह)- ५४ एकर, जांभळी व जुनखड शिवार – १४ एकर, लहान व मोठी लांबकानी शिवार – २९ एकर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *