Headlines

वैद्यकीय पदवी नसताना उपचार करणारा तोतया डॉक्टर जेरबंद:फुरसुंगी पोलिसांनी केली कारवाई, वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल




वैद्यकीय पदवी नसताना निसर्गोपचार केंद्राच्या नावाने रुग्णांवर उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी शहजाद इक्बाल मोहम्मद खान उर्फ राज पटेल (वय ३४, रा. खटीक मोहल्ला, सांगोद, जि. कोटा, राजस्थान) याला अटक करण्यात आली. याबाबत प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश पाखरे (वय ४९) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजाद खान याने हडपसर-सासवड रस्त्यावरील एका इमारतीत राज पटेल नॅचरोपॅथी केअर या नावे रुग्णालय सुरू केले होते. या रूग्णालयात तो रुग्णांवर उपचार करत होता. खान याच्याकडे वैद्यकीय पदवी नव्हती. वैद्यकीय पदवी नसताना तो उपचार करत असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर याबाबतची माहिती फुरसुंगी पोलिसांना कळविण्यात आली. फुरसुंगीतील एस. पी. रेसीडन्सी इमारतीतील खान याच्या दवाखान्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी खान याला अटक केली. त्याच्याविरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३३ (अ)अन्वये गु्हा दाखल करुन अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव तपास करत आहेत. व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची २० लाखांची फस‌वणूक व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याबाबत एकाने फिर्याद आली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनोज विनय काणे (वय ४६, रा. वेस्टएंड मॉल रस्ता, ओैंध) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपीने तक्रारदारला व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीच्या खात्यात टप्याटप्याने पैसे जमा केली. आरोपीच्या खात्यात २० लाख रुपये जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *