Headlines

व्यवसायाच्या ठिकाणीच हवी पर्यायी जागा:मनपा मात्र कारवाईवर ठाम, सोमवारपासून ‘नाे हॉकर्स झाेन’मधील कारवाई तीव्र हाेणार‎


.

शहरातील २३ प्रमुख मार्ग व परिसर ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषीत केले आहेत. या निर्णयानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून संबंधित भागातील फेरीवाले आणि किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागेची अद्याप पुरेशी व्यवस्था झालेली नसल्याने कारवाईवरून वाद निर्माण झाला असून, पर्यायी जागा देखील त्या-त्या भागातच देण्याची मागणी होत आहे.

गोरक्षण रोडवर हातगाड्या लावून व्यवसाय करणाऱ्या ३० ते ३५ छोट्या व्यावसायिकांनी उपायुक्त विजय पारतवार यांची भेट घेत निवेदन दिले. व्यवसायासाठी त्याच भागात पर्यायी जागा उपलब्ध करुन देईपर्यंत हातगाड्या लावण्याची परवानगी देण्याची मागणी केली. नियमांचे उल्लंघन करून रस्ते किंवा पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान हातगाड्या, वाहने आणि व्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र, कारवाई सुरू करण्यापूर्वी फेरीवाल्यांना त्या-त्या भागातच पर्यायी व्यवसायाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अचानक व्यवसाय इतर ठिकाणी हलवल्यास त्यांच्या उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. बसस्थानक ते सिटी कोतवाली, किल्ला चौक ते बाळापूर नाका, गांधी चौक ते ताजनापेठ, टिळक रोड, अकोट स्टँड, शिवाजी महाविद्यालय, चांदेकर चौक, जुना भाजी बाजार, फतेह अली चौक, दामले चौक, हुतात्मा चौक, सिव्हिल लाइन, रतनलाल प्लॉट, दुर्गा चौक, नेहरू पार्क, तुकाराम चौक, कौलखेड, टॉवर चौक, जठारपेठ, पोस्ट ऑफिस चौक, जवाहरनगर, सिंधी कॅम्प, खडकी, रेल्वे स्टेशन, अकोट फैल, डाबकी रोड, वाशीम बायपास नो हॉकर्स झोन केले आहेत. एकीकडे नो हॉकर्स झोनची अंमलबजावणी सुरू असताना दुसरीकडे फेरीवाल्यांसाठी तीन ठिकाणी हॉकर्स झोन प्रस्तावित करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानालगतची रस्त्याची जागा, खदान येथील मनपा कॉम्प्लेक्समधील आतील ओटे आणि डाबकी रोडवरील मराठी मुलांची शाळा क्रमांक ८ परिसर या ठिकाणांचा त्यात समावेश आहे. या ठिकाणी फेरीवाल्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, संबंधित ठिकाणी अद्याप हॉकर्स झोन विकसित करण्याच्या दृष्टीने ठोस हालचाली झालेल्या नसल्याची तक्रार फेरीवाल्यांकडून केली जात आहे.

शहरातील या मार्गांवर व्यवसायाला असतील निर्बंध

सोमवारपासून कारवाई तीव्र ^ फेरीवाले, व्यावसायिकांसाठी चार जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी गेल्यावर आम्ही टप्प्याटप्याने सुविधाही उपलब्ध करुन देऊ. रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारपासून कारवाई तीव्र होणार आहे. गणेश शहाणे, सहायक आयुक्त तथा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी, मनपा

सुविधा नसल्याने प्रस्तावित हॉकर्स झोनला प्रतिसाद नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *