![]()
शेती म्हणजे केवळ शेतकऱ्याचा विषय आणि पर्यावरण म्हणजे पुस्तकातील धडा, ही पारंपरिक चौकट मोडीत काढत वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी थेट मातीत हात घातला आहे. शाळेच्या परिसरातील परसबाग आता विद्यार्थ्यांसाठी केवळ हिरवाईचा को
.
या परसबागेत सध्या आल्याचे पीक जोमाने वाढले असून, हिरव्यागार पानांनी शाळेचा परिसर बहरला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहभागातून सेंद्रिय पद्धतीने हे पीक घेतले जात असल्याने त्यांना शेतीची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता येत आहे. आल्याच्या लागवडीसाठी किसन महादू चौगुले यांनी बियाणे मोफत दिले, तर आवश्यक सेंद्रिय खते अविनाश आढाव यांनी उपलब्ध करून दिली. परसबागेच्या मशागतीपासून पिकाच्या निगेपर्यंत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप गडगे तसेच महिला भगिनींचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जमीन तयार करणे, लागवड, पिकाची निगा आणि सेंद्रिय खतांचा वापर याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळत आहे.
पुस्तकातील ‘बियाणे ते उत्पादन’ हा धडा वाचण्याऐवजी तो विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने अनुभवला आहे. बियाणे निवडण्यापासून जमीन तयार करणे, लागवड, पिकाची काळजी आणि उत्पादनापर्यंतच्या शेतीच्या संपूर्ण प्रवासाची ओळख विद्यार्थ्यांना होत आहे.
या उपक्रमासाठी डी.बी. नाना वाळुंज आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, सहशिक्षिका छाया डुंबरे, सुनंदा तांबे, गीता बोराडे व सविता खेत्री यांनीही सहकार्य केले.
मोबाईलच्या पडद्यावर शेती पाहणाऱ्या पिढीला प्रत्यक्ष मातीचा स्पर्श देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये श्रम, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबनाचे संस्कार रुजवत आहे.