![]()
ई-पीक पाहणी प्रणालीमध्ये ठेंगोडा येथील अनेक गट नंबर उपलब्ध नसल्याने तसेच काही गटांचे भौगोलिक स्थान व जीपीएस लोकेशन नकाशावर योग्यरित्या दिसत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांची नोंद करणे शक्य होत नाही. या तांत्रिक त्रुटींमुळे पीकविमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकस
.
ई-पीक पाहणीच्या ऑनलाइन प्रणाली व मोबाईल ॲपमध्ये गावातील अनेक गट क्रमांक दिसत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही गट क्रमांक उपलब्ध असले तरी त्यांचे भौगोलिक स्थान, गटाच्या हद्दी अथवा जीपीएस लोकेशन योग्यरित्या उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतातील पिकांची नोंद करता येत नाही. भूमी अभिलेखातील अधिकृत नकाशे व जमीन अभिलेख यांच्या आधारे ई-पीक प्रणालीतील गट क्रमांक व नकाशांचे तांत्रिक समायोजन करून ही समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत ई-पीक पाहणी करता न येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी. तसेच अशा गटांची गावनिहाय व गटनिहाय यादी तयार करून संबंधित तांत्रिक विभागाकडे पाठवावी, अशीही मागणी आहे. समस्या दूर झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीसाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आहिरे यांनी केली आहे. निवेदनाची प्रत बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनाही देण्यात आली आहे.