Headlines

शिंदेंना मालकाचा आदेश, म्हणूनच बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो नाही:तुम्ही केंद्रात या, तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री देऊ, मोदींनी फडणवीसांना दिले आश्वासन; राऊतांचा दावा




एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणतात? आनंद दिघे माझे गुरू आहे म्हणतात? कसले गुरू, बाळासाहेब ठाकरे यांचा आणि तुमचा काय संबंध? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर अमित शहा घाबरले म्हणून रात्री 2 वाजता पुण्यात आले. शिंदे अमित शहायांच्या कृपेने मिळालेल्या शिवसेनेचे प्रमुख मानता ना मग अमित शहा यांच्या स्वागताच्या फलकावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही, ज्यांना शिंदे गुरू म्हणतात त्या आनंद दिघे यांचा फोटो नाही कारण मालकाने सांगितलंय ना बाळासाहेबांचा फोटो लावायचा नाही म्हणून. संजय राऊत म्हणाले की, या देशाची राजकीय उलथापालथ झाली ती केंद्रीय शिक्षण खात्यामुळे. 12 वर्षांत प्रथमच मोदींना कोणत्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला तो शिक्षण मंत्र्यांचा कारण त्यांच्यामुळे मोदी सरकारची नाचक्की झाली. देशातील विद्यार्थी आणि तरुण शिक्षण खात्याच्या कारभाराविरोधात आंदोलन करू लागला कारण तिथे वाळवी लागली होती. शिक्षण खात्यासाठी एक चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. देशात आजच्या घडीला उत्तम शिक्षणमंत्री कोण होऊ शकत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत हे नरेंद्र मोदी यांनाही माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. तुम्ही मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी घ्यावी अशी सूचना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना आश्वासन दिले आहे की तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल. या देशाला उत्तम शिक्षणमंत्री मिळो ही आमची आणि सरकारची इच्छा आहे. मोदी फेसबूक पंतप्रधान संजय राऊत म्हणाले की, पुण्यामधील एकनाथ शिंदे यांव्या पक्षाच्या कुठल्याही बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कुठेही फोटो नाही. हे डरपोक लोकं अमित शहा यांना घाबरतात म्हणून त्यांनी फोटो लावले नाही. उद्धव ठाकरेंना फेसबूक नेता म्हणणाऱ्या पक्षाचे नेते आज सोशल मिडीयावर येत जनतेशी संवाद साधत आहेत, हे फेसबूक पंतप्रधान आहेत. शिंदेंच्या हाती चावी गेल्यापासून चोरी संजय राऊत म्हणाले की, सिद्धिविनायक मंदिराबद्दल जो आरोप राज ठाकरेंनी केला आहे त्यामागे गंभीर सत्य दडले आहे. एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडे जेव्हापासून या मंदिराच्या चाव्या आल्या आहेत तेव्हापासून ही चोरी सुरू झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न येत नाही. कारण भाजपमध्ये ही परंपरा आहे की दिल्लीतूनच राज्य करायचे. गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? तुम्हाला माहिती आहे का? राजस्थान, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव माहिती आहे का नाही? कमीत कमी कार्यक्षम, नेतृत्व कारण्याची क्षमता कमी असणारा, कमी लोकप्रिय असा व्यक्तीला शोधून पदावर बसवले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *