Headlines

शिक्षक हे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर समाज घडविणारे शिल्पकार:खासदार भास्कर भगरेंचे प्रतिपादन; जिल्ह्यातील 20 गुणवंत शिक्षकांचा सन्मान‎




आजच्या घडीला केवळ विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करत नसून, समाज घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यासाठी शिक्षकांनी समाजाप्रति आपण काही देणे लागतो, याचा विचार करीत ज्ञानदानाचे कार्य करीत राहावे, असे आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी केले. पंचवटीमधील तपोवनातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात आपुलकी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतफे जिल्हाभरातील २० गुणवंत शिक्षकांना पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे सरचिटणिस ॲड. नितीन ठाकरे, डॉ. आर. व्ही. गोऱ्हे, रामनाथ डावरे, शिक्षक नेते बाजीराव जाधव, केंद्रप्रमुख रामदास खैरनार, आदर्श शिक्षक सतीश इंगळे, अरुण भामरे, विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे यांनी प्रास्ताविकात संस्थेतर्फे १५ वर्षांत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी जयवंत राऊत, कविता डावरे, बलराम माचरेकर, राकेश दळवी, सतीश चितोडकर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या शिक्षकांचा सत्कार संजीवनी शिंदे, चारुशीला पत्की, वैशाली महाजन, सुनीता भामरे, किशोरी नाकोड, अमृता धोंडगे, प्रा. अक्षय मोरे, गंगाधर बहिरम, वसंत पोटकुळे, वैभव मांजे, देवीदास राऊत, पांडुरंग भोर, संध्या कुलकर्णी, संजय ठाकरे, दीपक गायकवाड, संतोष खाडम, कैलास बागूल, गोविंद गिरी, प्रदीप महाले, विजय खरे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *