![]()
आजचा तरुण धर्म आणि जातीच्या जोखडात अडकून भरकटत आहे. देशातील वाढती विषमता बदलण्याची ताकद तरुणांमध्येच असून, प्रत्येक गाव-शहरात अभ्यासिका उभ्या राहिल्या पाहिजेत. अशा अभ्यासिकांमधून सुजाण माणसे घडतील, असे प्रतिपादन कवी नितीन चंदनशिवे यांनी केले. संगमेश्वर येथील सत्यशोधक मैदानावर ॲड. रामसिंग परदेशी सत्यशोधक मोफत अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सीताराम खैरनार होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण व्यवस्थेचे अभ्यासक प्रा. श्रीकांत काळोखे, अशपाक उमर, अशोक परदेशी, हरिश्चंद्र महाजन उपस्थित होते. अभ्यासिका केवळ परीक्षेची तयारी करण्याचे ठिकाण नसून विचारशील आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे केंद्र आहे. अभ्यासिका जपणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असल्याचे ही चंदनशिवे म्हणाले. प्रा. श्रीकांत काळोखे यांनी शिक्षण व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. अशपाक उमर यांनी १८९५ पासून आजपर्यंतच्या मराठी बालभारती पुस्तकांचे प्रदर्शन मांडले. प्रास्ताविक प्रा. किशोर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन रविंद्र आहिरे व निनाद म्हसदे यांनी केले तर संचालक ताऊभैया परदेशी यांनी आभार मानले. यावेळी राजेंद्र भोसले, उमेश अस्मर, भिला महाजन, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, अजय शहा आदी उपस्थित होते.
Source link
प्रत्येक गाव- शहरामध्ये अभ्यासिका उभारणे गरजेचे:संगमेश्वर कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रतिपादन