Headlines

पाचोडसह करमाडला वरुणराजा बरसला:पैठण, फुलंब्री, सोयगावमध्ये रिमझिम, खरीप हंगामातील पिकांना दिलासा‎




जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, रविवारी सकाळी पाचोड परिसरात तर सायंकाळी ५ वाजता करमाड परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, लाडसावंगी, लोहगाव, ढाकेफळ, ढोरकीन परिसरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. सोयगाव तालुक्यात ३१ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने पुनरागमन केले आहे. रविवारी सावळदबारा, बनोटी, सोयगाव आणि जरंडी भागात रिमझिम व मुसळधार पाऊस झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *