Headlines

शिरसाट अन् बावनकुळेंना सोडणार नाही:नोंदी रद्द करून मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव, विखे पाटलांना उपसमितीचे काम करायला वेळ नाही- मनोज जरांगे




एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना पुढे करून, तर देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत मराठा समाजाचे वाटोळे केले आहे. आम्ही यापैकी कोणालाही सोडणार नाही. जर आम्हाला प्रमाणपत्रे दिली तर आमचे प्रेम पूर्वीसारखेच राहील; अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही. ज्यांचे असे म्हणणे आहे की ही प्रमाणपत्रे कायद्याच्या कसोटीवर रद्द झाली, त्यांनी अंतरवलीला येऊन ते सिद्ध करून दाखवावे, असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे म्हणाले की, एकाच कुटुंबात बहिणीला जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) मिळते, मग भावाचे प्रमाणपत्र रद्द कसे होऊ शकते? जात पडताळणी अधिकारी व्हॅलिडिटीबाबत अधिकृत पत्र देणार असताना, संजय शिरसाट आणि चंद्रशेखर बावनकुळे ते रद्द करायला सांगत आहेत. मी हवेत किंवा फुकट आरोप करत नाही. मी छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे का? नाही, कारण त्यांचा याच्याशी काही संबंध नाही ज्यांचा संबंध नाही त्यांचे नाव घेण्याचे काम आम्ही करत नाही तसे आमच्यावर तसे संस्कार नाहीत. फडणवीसांनी लक्षात ठेवावे, आता आम्ही सावध आहोत मनोज जरांगे म्हणाले की, सरकारला आंदोलकांवर हल्ले घडवून आणण्याशिवाय दुसरे काही येत नाही. पूर्वी आम्ही बेसावध होतो; आमच्या आंदोलनाच्या मंडपात पोलिसांना घुसण्याचा कोणताही अधिकार नव्हता. आम्ही कोणालाही त्रास देत नव्हतो, तरीही आमच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आमच्या मंडपात घुसून कारवाई केली. देवेंद्र फडणवीस यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी—तेव्हा तुम्ही कारवाई केली, पण आता आम्ही तसे काहीही होऊ देणार नाही. आता आम्ही पूर्णपणे सावध आहोत. सरकारची ही मस्ती सर्व जातींमधील लोक उतरवतील, कारण सध्या या राज्यात कोणीही सुखी नाही. माझे हे शेवटचे आंदोलन असेल मनोज जरांगे म्हणाले की, मी कोणाचाही मिंधा नाही, त्यामुळे चूक झाल्यावर मी कोणावरही बोलू शकतो. म्हणूनच मी एकनाथ शिंदेंवरही टीका केली आहे. मी कोणाकडूनही एक रुपया घेतलेला नाही. मी यांच्यासाठी समाजाला सोडू शकत नाही; समाज अमर आहे. माझे हे शेवटचे आंदोलन असून, आम्ही आमच्या सर्व मागण्या मान्य करायला लावणारच. हा आमच्या आरक्षणाचा विषय असल्याने आम्ही शिरसाट किंवा बावनकुळे, कोणालाही सोडणार नाही. 58 लाख नोंदी रद्द करण्याचा सरकारचा डाव मनोज जरांगे म्हणाले की, जोपर्यंत 58 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्रे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही कोणाचेही ऐकणार नाही. केवळ जीआर (शासकीय निर्णय) निघाला म्हणून आम्ही शांत बसणार नाही, तर प्रत्यक्ष प्रमाणपत्रे आणि व्हॅलिडिटी मिळालीच पाहिजे. ज्यांची प्रमाणपत्रे निघाली आहेत, त्यांची व्हॅलिडिटी का होत नाही? जुन्या नोंदी शोधल्यामुळे त्या आता समोर आल्या आहेत. या 58 लाख नोंदी कमी करण्याचा सरकारचा डाव आहे, कारण या नोंदींमुळे सुमारे 3 कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मराठा समाज मोठा होऊ नये, हीच सरकारची इच्छा आहे. पण मी यांना घाबरत नाही. शिंदेंनी शोधलेल्या नोंदी रद्द करून देवेंद्र फडणवीस त्यांचे नाव खराब करत आहेत का? की मराठ्यांना 58 लाख नोंदींचे आकडे सांगून शिंदेंनीच आमची फसवणूक केली आहे? शिंदे समिती ही नवीन नोंदी शोधण्यासाठी होती. उदय सामंत यांनी 58 लाख नोंदी सापडल्याचे व त्यानुसार प्रमाणपत्रे देणार असल्याचे कबूल केले होते. मग आता फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यांवरून हे सर्व मुद्दाम सुरू आहे का, असा प्रश्न पडतो. विखे पाटील आणि शिंदे समिती गांभीर्याने काम करत नाही मनोज जरांगे म्हणाले की, विखे पाटील स्वतःचे नाव खराब करून घेत आहेत. त्यांनी सरकारला प्रमाणपत्रे वाटायला भाग पाडले पाहिजे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद असेपर्यंत त्यांनी समाजासाठी काम केले पाहिजे. विखे पाटलांना या विषयातील काहीच माहिती नाही आणि त्यांच्याकडे उपसमितीच्या कामासाठी वेळही नाही. केवळ जीआर काढून काही होणार नाही; किती प्रमाणपत्रे वाटली, याचा हिशोब उपसमितीकडे नाही. तसेच शिंदे समितीला वेळ दिला, तरीही ती काहीच काम करत नाही. बावनकुळेंविरोधात माझ्याकडे भयानक पुरावे मनोज जरांगे म्हणाले की, बावनकुळे यांच्या पक्षातील विरोधकच माझ्याकडे येत आहेत. मी जर बोलायला लागलो, तर बावनकुळे खूप रडतील; कारण माझ्याकडे त्यांच्याबद्दल भयानक पुरावे आले आहेत. मला राजकारणाशी काही देणेघेणे नसल्यामुळे मी ते समोर आणणार नाही. फडणवीसांचे पोलिस लोकांवर लाठ्या चालवतात. 15 वर्षे आरक्षण देण्याच्या केवळ गप्पा मारल्या जात आहेत, प्रत्यक्षात त्याचा काहीही फायदा झालेला नाही. महाराष्ट्रात शेतकरी, सर्वसामान्य सुखी नाहीत मनोज जरांगे म्हणाले की, स्मार्ट मीटरमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा जास्त वीजबिल येत आहे. त्यांनी हे बिल कसे भरायचे? या राज्यात नोकरदार, शिक्षक, डॉक्टर, नर्स किंवा एसटी चालक—कोणाचेही पगार वेळेवर होत नाहीत. व्यावसायिक, मारवाडी, जैन, कैकाडी असा कोणताही समाज आज सुखी नाही. कैकाडी समाजाला मराठवाड्यात ओबीसी, विदर्भात एसटी आणि खानदेशात एससी दर्जा दिला आहे. वा रे फडणवीस! मी त्यांच्यावर वर्षभर बोललो नव्हतो, पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिथावणी दिल्यानंतरच मी त्यांच्याविरोधात बोलायला सुरुवात केली.

प्रमुख मागण्या कोणत्या? जरांगे : 58 लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे द्या. दिलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करा. अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्रे द्या. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला, पण प्रमाणपत्रे व पडताळणीचे काय? सातारा, कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी आणि ‘सारथी’सह सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही. नोंदींमध्ये विसंगती का आहे? जरांगे :जुन्याच नोंदी आंदोलनादरम्यान शोधल्या, त्याचे प्रोसिडिंग आहे. पण 3 कोटी मराठे आरक्षणात येऊ नयेत म्हणून सरकार नोंदी कमी करत आहे. फडणवीस जाणीवपूर्वक हे करत आहेत. यात शिंदेंना डॅमेज करण्याचा डाव असू शकतो किंवा शिंदेंनीच समाजाला वेड्यात काढले असावे. सामंत व देसाई 58 लाख नोंदी मान्य करतात, मग विखे-फडणवीसांनाच त्या कमी का करायच्यात? हे षड््यंत्र असू शकते. उपसमिती अध्यक्ष विखे पाटलांवर नाराजी का? जरांगे :विखे पाटील समितीच्या कामाबाबत गंभीर नाहीत. त्यांना प्रमाणपत्रांचा अचूक आकडाही माहिती नाही. 58 लाख नोंदींची प्रमाणपत्रे देण्याबाबत आणि थांबलेल्या पडताळणीबाबत ते ठामपणे विचारणा करत नाहीत. ओबीसींच्या धर्तीवर दिलेल्या सवलतींच्या जीआरचाही उपयोग नाही. ते केवळ आमचे उपोषण सोडवायला किंवा पुढे ढकलायला येतात. किती दिवस उपोषणाची तयारी आहे? जरांगे :समाजाच्या वेदनांपुढे माझ्या वेदना क्षुल्लक आहेत. शेतमालाला भाव नाही, मुलांना नोकरी-शिक्षण नाही. त्यामुळे प्रकृतीची पर्वा न करता उपोषण करणार. मुंबईकडे कधी निघणार? जरांगे : हे 29 ऑगस्टला जाहीर करू. समाजाने एकाच दिवशी आंतरवालीत न येता टप्प्याटप्प्याने यावे, असे आवाहन आहे. आझाद मैदान सायंकाळी 6 पूर्वी खाली करण्याच्या नियमावर काय सांगाल? जरांगे : मी मैदान सोडणार नाही. आम्ही निर्बंध जुमानणार नाही. जिथे जागा मिळेल तिथे अन्न शिजवून झोपू. परवानगी मागून आम्ही कायद्याचा मान राखला. वेळ पडल्यास मी ‘वर्षा’ बंगल्याच्या छतावर बसेन. म्हणजे तुम्ही ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन करणार? जरांगे :‘वर्षा’, मुंबई आणि महाराष्ट्र आपलाच आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्क किंवा ‘वर्षा’वरही आंदोलन करू. फडणवीस आमचेच असल्याने ते येऊ नका म्हणणार नाहीत. अडचण असल्यास आम्ही बंगल्याच्या टेरेसवर बसू. समाजाचा हाच पाठिंबा कायम ठेवण्यासाठी रणनीती काय? जरांगे :हे निर्णायक आंदोलन असून यानंतर आरक्षणासाठी आंदोलन होणार नाही. सर्व मागण्या मान्य करूनच घेऊ. समाजाचे नुकसान करणाऱ्या बावनकुळे किंवा शिरसाट यांना सोडणार नाही. शिंदे व फडणवीस यांनीच त्यांना पुढे करून मराठ्यांचे वाटोळे केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *