![]()
सध्याच्या वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यामुळे पर्यावरण संतुलनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. कोरोनानंतरच्या काळात स्वच्छ, निरोगी, हरित पर्यावरणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक
.
तिवसा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ. राजेश वानखडे यांच्याहस्ते श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या प्रस्तावित जागेवर (श्रीजीत मंगल कार्यालयाजवळ) वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन आ.
वानखडे व उपस्थित मान्यवरांनी केले. “वाढते प्रदूषण, वृक्षतोड, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे. ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित आणि हिरवागार वारसा देण्यासाठी आजपासूनच कृती करण्याची गरज आहे,” असे आमदार म्हणाले.
वृक्षारोपण कार्यक्रमानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेद्वारे जनतेमध्ये स्वाभिमान, संघटन, राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या याच विचारांमधून प्रेरणा घेत
समाजहिताच्या कार्यात सक्रिय योगदान देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. या पर्यावरणपूरक आणि अभिवादन कार्यक्रमाला परिसरातील
अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने प्रदीप गौरखेडे, विनोद पटेल, संजय देशमुख, विद्याधर दंडाळे, राजेंद्र पालीवाल, पप्पू देशमुख, श्रीधर देशमुख, प्रकाश अण्णा पडोळे, सुधिर गोडसे, राजाभाऊ देशमुख, अजय गुल्हाने, राजाभाऊ टेकाडे, अंकुश देशमुख, सुमित अनासने, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, राहुल धडांगे, सुधीर वानखडे, अनुप आढावू, दिनेश माळोदे, भोजराज गंधे, नंदकिशोर देशमुख, सुनील बहाद्दरपुरे, मयूर वानखडे, आनंद मानमोडे, सतीश नंदनवर, वैभव भोंबे यांच्यासह तिवसा परिसरातील अनेक नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.