![]()
यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर असून पाण्याअभावी सोयाबीन, तूर, कपाशी करपून गेली आहे. फळबागा, पाणी व चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने शुक्रवारी शेकटा मंडळातील देमणी वाहेगाव शिवारातील गट क्र. ८३ मध्ये सोयाबीनची ३० मिनिटे पाहणी केली. शेतकरी विकास शिंदे यांनी सोयाबीनसाठी एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करूनही पीक जळाले असल्याचे सांगत खर्चही निघणार नसल्याची व्यथा मांडली. पावसाच्या मोठ्या खंडामुळे पशुधनासाठी पाणी व वैरणीची टंचाई निर्माण झाल्याने केंद्राने भरीव मदत द्यावी, अशी मागणी केली. अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला जाईल, असे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांनी सांगितले. पथकात उपसंचालक सुनील कुमार दुबे, डॉ. जसपाल सिंह, साक्षी भदोरिया यांचा समावेश होता. पाहणीवेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, सुनील वानखेडे, दीपक गवळी, सदानंद बिडवे, मेघश्याम गुळवे, संतोष लोळगे, तलाठी प्रशांत व कृषी सहायक कृष्णा गट्टूवार उपस्थित होते.
Source link
शेकटा मंडळात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी पिकांची 30 मिनिटे पाहणी:शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा: पथक पाहणीचा अहवाल केंद्र शासनास देणार