Headlines

शेतकऱ्याला दुष्काळाच्या झळा:तेराही तालुक्यांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; पैसेवारी मात्र घोषित नाही




जिल्हा हा कायम स्वरुपी दुष्काळाच्या छायेत असणारा म्हणून ओळख निर्माण होत आहे. कधी अतिवृष्टीने तर कधी कमी पर्जन्यमानामुळे नुकसान होणारा या जिल्ह्याला यंदा तेराही तालुक्यात दुष्काळ बघावयास मिळाला आहे. शासनानेही तेरा तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे. हा दुष्काळ जाहीर केल्यानंतरही आर्थिक अडचणीमुळे रताळी तालुका सिंदखेडराजा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. गतवर्षीही जिल्ह्याची पैसेवारी ४९ निघाली होती. त्यावेळीही जिल्हा दुष्काळातच होता. यंदा मात्र पैसेवारी काढण्याची वेळ आली नाही पावसाचा सप्टेंबर महिन्यात खंड पडला होता. त्यामुळे बुलडाणा ६६.०७, चिखली ५९.९६, देऊळगावराजा ६७.१७, सिंदखेडराजा ६१.०७, लोणार ५४.४०, मेहकर ६४.९६, खामगाव ५८.६०, शेगाव ६९.८६, मलकापूर ६३.५७, नांदुरा ७५.०७, मोताळा ६७.६६, संग्रामपूर ५३.८३, जळगाव जामोद तालुक्यात ८०.३९ टक्के इतका पाऊस पडला आहे. सरासरी ६४.५५ टक्के पाऊस पडला आहे. आकाशवर होता कर्जाचा बोजा साखरखेर्डा | रताळी येथील २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आर्थिक अडचणींतून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. आकाश बळीराम पाटील (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. पीक नुकसान, शेतीतील वाढता खर्च तसेच वडिलांवरील कर्जाचा वाढता बोजा यामुळे तो आर्थिक अडचणीत असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पंचनामा केला. २०२५ -२६ मध्ये गावांची पैसेवारी अशी तालुकानिहाय ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली गावांमध्ये बुलडाणा ९८, चिखली १४४, देऊळगावराजा: ६४ , मेहकर: १६१, लोणार: ९१ , सिंदखेडराजा: ११४, मलकापूर: ७३ , नांदुरा: ११२ ,खामगाव: १४६ ,जळगाव जामोद: ११ ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावे असणारे तालुक्यांमध्ये मोताळा: १२० गावे, शेगाव: ७३ गावे, संग्रामपूर १०५ गावे होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *