![]()
शेती, माती आणि बैल यांचं नातं म्हणजे केवळ कष्टाचं नव्हे तर जिव्हाळ्याचं आणि भावनेचं नातं आहे. काळ बदलला, शेतीची साधनं बदलली; मात्र गोणेगाव येथील ९२ वर्षीय ज्येष्ठ शेतकरी साहेबराव कुंडलिक रोडे यांच्या मनातील बैलांबद्दलचं प्रेम आजही तितकंच जिवंत आहे. त
.
बैलांना मारहाण करणे त्यांना कधीच आवडत नाही. उलट प्रेमाने आणि संयमाने मुक्या प्राण्यांना हाताळण्यावर त्यांचा विश्वास आहे. आजही मारकुट्या बैलाला मी शांतपणे आणि व्यवस्थित हाताळतो. बैल हा अत्यंत समजूतदार प्राणी आहे. शेतकऱ्याचं प्रेम त्याला कळतं, असे ते सांगतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीतील बैलांचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र यामुळे शेतीच्या मातीवर होणाऱ्या परिणामाचीही चिंता साहेबराव पाटील व्यक्त करतात. ट्रॅक्टर व अवजारांच्या वाढत्या वापरामुळे जमीन कठीण होत असल्याचे ते सांगतात.
आज एका चांगल्या बैलाची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असली तरी साहेबराव पाटील यांच्या दृष्टीने बैलाची किंमत पैशांत मोजता येणारी नाही. कारण त्यांच्यासाठी बैल हा केवळ शेतीचा साथीदार नसून कुटुंबातील एका सदस्यासारखा आहे. आजच्या वातावरणात मुक्या जनावरांचं प्रेम माणसापेक्षा मुक्त आणि श्रेष्ठ वाटतं, या त्यांच्या शब्दांतून बैलांशी असलेल्या सात दशकांच्या नात्याची खोली जाणवते. वयाच्या ९२व्या वर्षीही बैलांना प्रेमाने हाताळणाऱ्या साहेबराव पाटील यांची भेट ही एका शेतकऱ्याची आठवण नाही; तर माणूस आणि बैलासारखे मुक्या जीवामधील विश्वास, प्रेम जपणारी ग्रामीण संस्कृती दिसते.
आज एका चांगल्या बैलाची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असली तरी साहेबराव पाटील यांच्या दृष्टीने बैलाची किंमत पैशांत मोजता येणारी नाही. कारण त्यांच्यासाठी बैल हा केवळ शेतीचा साथीदार नसून कुटुंबातील एका सदस्यासारखा आहे. आजच्या वातावरणात मुक्या जनावरांचं प्रेम माणसापेक्षा मुक्त आणि श्रेष्ठ वाटतं, या त्यांच्या शब्दांतून बैलांशी असलेल्या सात दशकांच्या नात्याची खोली जाणवते.