![]()
कळमनुरी तालुक्यातील शेनोडी-रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या शासन स्तरावरील प्रस्तावाला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने रविवारी ता. १ इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यात तीन तास ठिय्या आंदोलन केले. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यातआले. इसापूर जलाशयातून शेनोडी-रामवाडी उपसा जलसिंचन योजने अंतर्गत १९५८ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, शासनाकडे प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमधून तिव्र असंतोष निर्माण झाला. त्यानंतर पाणी हक्क संघर्ष समितीने या प्रस्तावाला शासनस्तरावरून तातडीने प्रशासकिय मान्यता द्यावी या मागणीसाठी रविवारी ता. १ कालव्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान आज मसोड, शिवनी, रामवाडी, मुंढळ आणि असोलवाडी या पाच गावांतील शेतकऱ्यांनी तरोडा शिवारातील इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यात जाऊन ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रशासनाकडून आजच कालव्यात पाणी सोडले जाणार असल्याने अनुसीचत प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाची चांगलीच धावपळ सुुरु झाली. त्यानंतर उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, उपविभागीय अभियंता डी. एस. शुर यांनी यांनी तातडीने आंदोलन स्थळी धाव घेतली आणि आंदोलकांशी चर्चा केली. पाण्याचा प्रश्न व उपलब्धता तसेच वषरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून शासनाकडून तातडीने मंजुरी व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन लांब यांनी दिले. त्यानंतर हे ओदोलन मागे घेण्यात आले. आंदोलना दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून कळमनुरी पोलीस स्टेशनचे उपाधिक्षक मयूर रसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, जमादार गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखने यांनी बंदोबस्त ठेवला होता. ५ नोव्हेंबर पासून पुन्हा आंदोलन उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाने लेखी आश्वासन दिले असले तरी ता. ५ नोव्हेंबरपर्यंत प्रशासकिय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यामुदतीत मान्यतेचे काम पूर्ण न झाल्यास ता. ५ नोव्हेंबरपासून हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
Source link
शेनोडी-रामवाडी उपसा सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांचे कालव्यात ठिय्या आंदोलन:प्रशासकीय मान्यतेसाठी पाणी हक्क संघर्ष समिती आक्रमक