Headlines

श्रीकृष्ण मंदिरात लीळाचरित्रावर निरुपण:उद्यापासून 9 ऑगस्टपर्यंत दिगंबर मुनी अंकुळनेरबाबा करणार प्रवचन




अमरावती येथील माताखिडकी स्थित द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात गुरुवार, ३० जुलैपासून लीळाचरित्र निरुपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प. पु. श्री दिगंबर मुनी अंकुळनेरबाबा महानुभाव हे निरुपण करणार आहेत. महानुभाव वासनिक सेवा मंडळ आणि श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. श्री चक्रधर स्वामींच्या अगम्य लीळांवर आधारित हे निरुपण दररोज सायंकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत होईल. वडनेर भुजंग येथील देवदत्त आश्रमाचे संचालक मुनी अंकुळनेर बाबा महानुभाव आपल्या प्रभावी वाणीतून लीळाचरित्राचे विवेचन करतील. प. पु. बाबांची प्रवचने देशभरात अनेक ठिकाणी नियमितपणे होत असतात. या प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन ३० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव पावडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक राऊत, सचिव ॲड. अरुण ठाकरे, कोषाध्यक्ष एस. पी. देशमुख आणि मंडळाचे अध्यक्ष बाबुराव बोराळकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बडनेरा आश्रम येथील प. पू. प. म. आचार्यप्रवर श्री दर्यापुरकर बाबा असतील. अमरावती महानुभाव वासनिक सेवा मंडळ आणि श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टने सर्व भाविकांना या प्रवचन सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *