Headlines

श्री रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग दर्जाची मागणी:2.50 कोटी मंजूर, तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेंतर्गत 2.50 कोटीतून 90% कामे पूर्ण‎



तालुक्यातील दहीहंडा येथील श्री संत रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह ग्रामविकास विभागाच्या सह

.

श्री रूपनाथ महाराज संस्थान हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील लाखो भाविक भक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे. महाराजांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येथे वर्षभर भाविकांची मोठी मांदियाळी असते. या पार्श्वभूमीवर, येथे येणाऱ्या भक्तांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवणे अत्यंत आवश्यक असल्याने या संस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

भाविकांसाठी सुविधांची उभारणी : आ. रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांतून तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेंतर्गत या संस्थानच्या विकासासाठी शासनाकडून २.५० कोटी रुपयांचा निधी आधीच मंजूर झाला आहे. या निधीतून भाविकांसाठी विविध मूलभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू असून, सद्यःस्थितीत सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *